spot_img
spot_img

तुपकरांच्या नेतृत्वात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे देऊळगाव राजात भिक मांगो आंदोलन, ५ हजार रु ची भीक सरकारला पाठवली,शेतकऱ्यांना भीक नकोय ,हेक्टरी एक लाख द्या, राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवणार – रविकांत तुपकर

देऊळगावराजा (हॅलो बुलढाणा) सध्या राज्यभर भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याऐवजी शासनाने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. पाच हजाराची भीक शासनाने दिली परंतु आम्हाला भीक नको आमच्या घामाचे दाम हवे,असे म्हणत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज देऊळगावराजात अनोखे भीक मांगो आंदोलन केले. या आंदोलनात स्वतः शेतकरी नेते रविकांत तुपकर सहभागी झाल्याने हे आंदोलन चांगलेच लक्षवेधी ठरले. भिक मागून जमा झालेली रक्कम तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला जमा करण्यात आली तसेच मागण्यांचे निवेदन देखील सुपूर्द करण्यात आले. कोणत्याच अटी आणि मर्यादा न ठेवता हेक्टरी १ लाख नुकसानभरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जाण्यासाठी तयार राहा असा गंभीर इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला असून लवकरच राज्यभर आंदोलन उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या संपूर्ण राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनता दुष्काळ आणि महागाईने होरपळून जात आहे. अशावेळी मायबाप सरकारने भरघोस मदत देण्याचे सोडून शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची भीक देऊन त्यांची क्रूर चेष्टा केली आहे. त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ चांगलेच भडकले आहे. त्याचाच परिणाम आज देऊळगाव राजा शहरात देखील दिसून आला. शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही म्हणून क्रांतिकारीच्या शिलेदारांनी देऊळगाव राजा शहरात भीक मागून आंदोलन करून निधी जमा केला. जमा झालेली ही मदत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडे जमा करण्यात आली. प्रचंड दुष्काळ असताना कुंभमेळा घेण्यासाठी करोडो रुपये सरकारकडे आहेत, दुष्काळाच्या परिस्थितीतही करोडो रुपयांच्या वाहन खरेदीसाठी शासनाकडे पैसे आहेत, मंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यासाठी पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठीच पैसे नाहीत का असा संतप्त सवाल यावेळी रविकांत तुपकर यांनी केला. मंत्री आमदार खासदार सचिव जिल्हाधिकारी यांचे तीन महिन्याचे पगार थांबवा, कुंभमेळा रद्द करा, मंत्र्यांच्या दौऱ्यावरील खर्च बंद करा आणि अन्नदात्या शेतकऱ्याला मदत करा अशी मागणी यावी रविकांत तुपकर यांनी केली. चारा छावण्यांचे नियोजन डिसेंबर मध्ये न करता आतापासून चाराचे नियोजन करावे, छावनीला नको दावणीला चारा द्या, हेक्टरची मर्यादा न ठेवता हेक्टरी १ लाख नुकसानभरपाई द्या; अशी आग्रही मागणी यावी रविकांत तुपकर यांनी केली. भीक मागून जमा केलेली रक्कम आणि मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडे सुपूर्द करण्यात आले.

लवकरच राज्यव्यापी आंदोलन : तुपकर
शेतकरी सध्या प्रचंड संकटात आहे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासह मानसिक आधार देणे गरजेचे असताना सरकार मात्र शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत आहे. कुंभमेळा घ्यायला पैसे आहेत, दुष्काळातही करोडोंचे वाहन खरेदी करायला पैसे आहेत मंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यासाठी करोड रुपये खर्च करायला पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना द्यायलाच पैसे नाहीत का? असा संतप्त सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला असून या प्रश्नाचा विचारण्यासाठी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गावगाड्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून या सरकारला बळीराजाची ताकद दाखवून देऊ. त्याची तयारी देखील सुरू झाली आहे त्यामुळे आता लवकरच राज्यभर आक्रमक आंदोलन उभारणार आहे असा इशारा यावे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

यावेळी मधुकर शिंगणे, जुल्फेगार शेठ, सहदेव लाड, प्रदीप हिवाळे, बालाजी सोसे, वसंतराव पाटील, पुरुषोत्तम शिंगणे, देविदास शिंगणे, जिलानी भाई, राजू नागरे, गजानन जायभाये, किसान नागरे, पिंटू डोके, संदीप शिंदे, गणपत शेळके, राजेंद्र शिंगणे, गणेश वाघ, गजानन डिघोळे, रामेश्वर घुले, प्रदीप सोनुने, किरण पाटील, धनंजय सोसे यांच्यासह परिसरातील अनेक कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!