spot_img
spot_img

‘डिजिटल अरेस्ट’चा प्रकारच नाही! सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे! जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे आवाहन!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘तुमच्या नावावर मनी लाँडरिंगचा गुन्हा आहे… तुमचे बँक खाते गैरव्यवहारासाठी वापरले गेले आहे… तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे.’ असा व्हिडीओ कॉल आला आणि समोर पोलिस, सीबीआय किंवा ईडीच्या गणवेशातील व्यक्ती दिसली, तर अनेकांना तो खरा अधिकारी असल्याचा भास होतो. त्यानंतर सुरू होते भीती, दबाव आणि पैशांची मागणी. प्रत्यक्षात ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नाही. तो सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा आहे. संशयास्पद फोन आल्यास 1930 किंवा 1945 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे.

नजीकच्या काळात सायबर गुन्हेगारांकडुन डिजिटल अरेस्टचे जाळे पसरविल्या जात आहे. या नविन गुन्हेगारी युक्तीचा वापर करून ज्येष्ठ नागरिकांना भीती दाखवत ऑनलाइन फसवणूक केली जात आहे.मात्र डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार नसतो. तेव्हा नागरिकांनी डिजिटल अरेस्ट पासून सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे. सायबर गुन्हेगार नागरीकांना फोन (व्हॉइस कॉल)किंवा व्हाट्सअप व्हॉइस कॉल तथा व्हॉइस कॉल व्दारे संपर्क साधतात. स्वत:ला सीबीआय,इडी,कस्टम, एनआयए किंवा कोणत्याही पोलीस विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे भासवून तुमच्या नावावर बेकायदेशीर पार्सल आलेले आहे, तुमच्या नावावरील सिमकार्ड वरुन देशविरोधी कृत्य होत आहे तसेच तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रींग किंवा आतंकवादी संघटनांना निधी दिल्या जात आहे, आदी प्रकारची भिती दाखविली जाते. व त्यानंतर नागरिकांना घरातच व्हाट्सअप व्हिडिओ कॉल द्वारे डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे, असे सांगण्यात येवून तासन्तास स्क्रिनसमोर बसवुन ठेवतात. व नागरीकांकडुन त्यांच्या बँक खात्याचे तपशील तसेच मौल्यवान दागदागीने इत्यादीची माहीती घेवुन त्यानंतर या सर्व प्रकारातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैश्यांची मागणी केली जाते. ही डिजिटल अरेस्ट गुन्ह्याची पद्धत आहे. मात्र डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार भारतीय न्यायव्यवस्थेत नाही. कोणतीही तपास यंत्रणा किंवा पोलीस दल व्हिडिओ कॉल व्दारे कोणत्याही व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करत नाही.अश्या प्रकारचा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे अश्या स्वरुपाचा कॉल आल्यास घाबरून न जाता तात्काळ कॉल कट करा. अनोळखी नंबरवरुन येणारे संशयास्पद व्हाट्सअप व्हिडिओ कॉल, व्हाईस कॉल, मेसेजला प्रतीसाद देवु नका. वैयक्तिक माहीती शेअर करु नका. तुमचा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड, ओटीपी इत्यादी तुमच्या बँक खात्याची माहीती देणे टाळा. वैयक्तिक माहीती तसेच दैनंदीन कामकाजाची माहीती सोशल मिडीया प्लॅटफॉर्म उदा.व्हाट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम, फेसबुकवर टाकणे टाळावे. अश्या प्रकारचे कॉल आल्यास तत्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रं 1930 किंवा 1945 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंद करावी किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईट वर सुध्दा तक्रार नोंदवावी तसेच शक्य असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करावा,असे आवाहन बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!