spot_img
spot_img

‘समृद्धी’वर वाहनाच्या धडकेत एक जण ठार! मृतकाची ओळख पटविण्याचे डोणगाव पोलिसांचे आवाहन!

डोणगाव (हॅलो बुलढाणा) समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक २७१ जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून,मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सदर मृतदेहाची अवस्था अत्यंत विद्रूप झाल्याने अद्याप ओळख पटलेली नाही. धडक देणारे वाहनघटनास्थळावरून पसार झाले असून, अपघात आणि घातपात, या दोन्ही शक्यतांचा तपास डोणगाव पोलिसांनी सुरू केला आहे. 1 सप्टेंबरच्या रात्री महामार्गावर अपघात झाल्याची माहिती एका नागरिकाने ‘डायल ११२’ या आपत्कालीन हेल्पलाइनवर दिली. माहिती मिळताच डोणगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी हर्षे सहगल, महामार्ग पोलिस, रुग्णवाहिकाआपत्कालीन वैद्यकीय आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मेहकर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली नाही,याबाबत कुणाला माहिती असल्यास डोणगाव पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!