चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शेतातील शेड मधील बांधलेल्या एकुण २४५०० रुपये किमतीच्या तीन बोकडांची चोरी करून बाजारात विकणाऱ्या दोन चोरट्यांना जालना जिल्ह्यातून तर एकाला जाफराबाद पोलीस ठाणे हद्दीत चिखली पोलिसाच्या डीबी पथकाने अटक केली आहे.
आदिल चौधरी, तसलीम नवरंगी,गोलू चौधरी या चोरट्यांनी विशाल शिवाजी लोखंडे रा.भोगावती ता.चिखली यांच्याशेतातील शेडमध्ये बांधलेले दोन बोकड व त्यांच्या चुलत भावाच्या शेतातील शेड मधील एक बोकड असे २४५०० रुपयांचे तीन बोकड सॉरी गेल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात २७ ऑगस्टला देण्यात आली होती. याप्रकरणी३०३(२),३(५) भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करून ठाणेदार भूषण गावंडे यांनी अधिनस्थ डीबी पथकाला तपासाची सूचना केली होती.दरम्यान पशुपालक यांनी चोरी गेलेल्या बोकडांची शोधाशोध सुरू केली असता खासगाव येथील बाजारात एक बोकड दिसून आले. सदर बोकड कोणी विकले? अशी विचारपूस केली असता आदिल चौधरी, तसलीम नवरंगी,गोलू चौधरी यांनी हे बोकड विकल्याचे व्यापाऱ्याने सांगितले. पशुपालकांनी हे बोकड परत आणले.दरम्यान आरोपीचा शोध घेत असतांना सदर आरोपी हे जालना जिल्ह्यात असल्याबाबतची माहीती गुप्त बातमीदाराकडुन डिबी पथकाला मिळाली होती. तपास अधिकारी पोहेका जनार्धन इंगळे, अमोल गवई, पोका निलेश सावळे, विशाल वायाळ या डिबी पथकाने जालना येथे जावून जालना हद्दीतील राममुर्ती गावातून दोन आरोपी तसेच पोलीस स्टेशन, जाफ्राबाद हददीतुन एका आरोपीला अटक केली आहे.ही कार्यवाही पोलीस अधिक्षक निलेश तांबे बुलडाणा,अपर पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड बुलडाणा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावारबुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. भुषण. गावंडे यांचे नेतृत्वात पोउपनि शरद भागवतकर, मपोउपनि अश्विनी गाडे, पोहेकॉ जनार्धन इंगळे, पोका विशाल वायाळ, डि.बी. पथकाचे पोहेका अमोल गवई, पोकॉ निलेश सावळे, पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे.













Total Users : 3381714