spot_img
spot_img

BIG BREAKING! बोरगाव वसू फाट्यावर भीषण अपघात; बसच्या धडकेत टिप्परचा अक्षरशः चुराडा! चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती; मदतीसाठी ‘हॅलो बुलढाणा’चे सय्यद साहिल घटनास्थळी!

चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) चिखली-खामगाव मार्गावरील बोरगाव वसू फाट्यानजीक बस आणि समोरून येणाऱ्या टिप्परची जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर एमएच २८ एबी ८२२८ क्रमांकाच्या टिप्परचा अक्षरशः चुराडा झाला. टिप्परचा दर्शनी भाग मधोमध फाटल्यासारखा झाला आहे

प्राथमिक माहितीनुसार, टिप्परचालक वाहनाच्या चक्काचूर झालेल्या केबिनमध्ये अडकला आहे. या दुर्घटनेत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृताची ओळख तसेच अपघातातील इतर जखमींची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

छत्रपती संभाजीनगर-देऊळगाव राजा-जालना-चिखली-खामगाव-अकोला येणारी ही बस आहे मार्गावरील या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच टीम ‘हॅलो बुलढाणा’चे चिखली प्रतिनिधी सय्यद साहिल यांनी घटनास्थळी धाव घेत माणुसकीच्या नात्याने मदतकार्य सुरू केले.

पोलीस व आपत्कालीन यंत्रणांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण, मृत व जखमींची संख्या स्पष्ट होईल. या घटनेचे सविस्तर अपडेट ‘हॅलो बुलढाणा’ लवकरच प्रसारित करणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!