spot_img
spot_img

अश्लील फोटो ठरले वादाचे कारण! दोघांवर चाकूचे सपासप वार!

चांडोळ (हॅलो बुलढाणा) मोबाईलवर अश्लील फोटो का पाठवले? म्हणत एकाने दोघांच्या पोटावर चाकूने सपासप वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घाड पोलीस ठाण्या अंतर्गत समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी शेख जुमान शेखजकाऊल्ला (30) रा. चांडोळ हा व त्याचा भाचा साहील खान शफीक खान घरासमोर बसले होते.दरम्यान आरोपी शेख रहीस शेख युनुस (38) रा. खोजी मोहल्ला चांडोळ याने तेथे येऊन ‘तू मला अश्लील फोटो का पाठवले?’ या रागात त्याने फिर्यादी व त्यांच्या भाच्यावर चाकूचे सपासप वार करून प्राणघातक हल्ला केला. या घटनेत फिर्यादी शेख जुमान शेख जकाऊल्ला व भाचा
साहील खान शफीक खान दोघांच्या पोटावर चाकूचा वार लागल्याने ते रक्तबंबाळ होऊन जखमी झाले. भांडणाच्या आवाजाने फिर्यादीचे वडील व चुलत भाऊ घटनास्थळी पोहोचल्याने आरोपी तेथून पळून गेला. फिर्यादीने मोबाईल हॅक झाल्याचे आरोपीला सांगितले होते परंतु आरोपीने चाकूचा वार केला. यावेळी आरोपीने दोघांनाही ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.आरोपीच्या या कृत्यामुळे गावात दहशत निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख रहीस शेख युनुस
विरुद्ध अपराध क्रमांक 352/2026 कलम 109, 352, 351 (2) बिएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!