spot_img
spot_img

BREAKING! चहाचा घोट घेईपर्यंत साडेतीन लाख गायब! लोणी नाक्यावर स्कॉर्पिओची काच फोडून रोकड लंपास; दुचाकीवरून चोरट्यांचा फिल्मी पोबारा!

लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) शहरातील लोणी नाक्यावर भरदिवसा चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबलेल्या कांदा बी व्यापाऱ्याच्या स्कॉर्पिओची दगडाने काच फोडून तब्बल साडेतीन लाख रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग घेऊन दुचाकीस्वार चोरट्यांनी पोबारा केला. ही धक्कादायक घटना गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

 

जालना येथील रहिवासी व सध्या केशव शिवनी येथे मुक्कामी असलेले कांदा बी व्यापारी दिलीप माधवराव खरले हे कांदा बी खरेदी करण्यासाठी पांगरा डोळे येथे आले होते. दरम्यान, शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी नाक्याजवळील एका हॉटेलसमोर त्यांनी आपली एमएच-२८ सीसी-५७५४ क्रमांकाची स्कॉर्पिओ लॉक केली आणि चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले.

याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने स्कॉर्पिओच्या चालकाच्या सीटमागील खिडकीवर दगड मारून काच फोडली. गाडीमध्ये ठेवलेली साडेतीन लाखांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग उचलून तो बाहेर थांबलेल्या दुचाकीस्वार साथीदारासह लोणी रोडच्या दिशेने पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घोगरे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली; मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

दिलीप खरले यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी अपराध क्रमांक ३४०/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३२४(२) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनाली गर्जे करीत आहेत

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!