spot_img
spot_img

जीव लहान असो की मोठा, भूतदयेत असावा ‘खारीचा वाटा!’ डॉ.लता बाहेकरांच्या सतर्कतेने वन्यजीव सोयरेने दिले खारीच्या पिल्लाला जीवदान!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) प्रभू श्रीरामचंद्र समुद्रावर सेतू बांधत असतानांच्या प्रचलित कथेतील खारुताई छोट्याशा तोंडात खडे व वाळू वाहत होती. तेव्हा या ‘खारीचा वाटा’ पाहून श्रीरामांनी कौतुकाने तिला जवळ घेत पाठीवरून हात फिरवला आणि खारुताईच्या पाठीवर उमटलेले ते पांढरे पट्टे म्हणजेच प्रभू रामाच्या बोटांचे व त्यांच्या आशीर्वादाचे प्रतीक समजल्या जाते.हे सांगायचं तात्पर्य एवढेच की, वन्यजीव सोयरेने एका जखमी खारुताईच्या पिल्लाला जीवनदान दिले आहे. प्रत्येकांनी अडचणीतील मुक्या जीवाला वाचविण्यासाठी ‘खारीचा वाटा’ उचलावा व भूतदया जपावी, असे आवाहन नितीन श्रीवास यांनी केले आहे.

शहरातील चैतन्य वाडी येथील प्रसिद्ध मानसिक रोग तज्ञ डॉ.लता बाहेकर यांच्या अंगणात सकाळी त्यांचा पाळीव कुत्रा एका खारुताईच्या पिल्ला सोबत खेळत होता. त्यांनी आणि त्यांच्या मुलाने व शेजारील मुलाने कुत्र्याला बाजूला केले. या झटापटीत ते पिल्लू झाडावर चढले पण थोडे शॉकमध्ये येऊन खाली पडून जखमी झाले. याबाबत डॉ.लता बाहेकर यांनी वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांना संपर्क साधून सदर घटनेबाबत माहिती दिली. तात्काळ वन्यजीव सोयरे गणेशकाका श्रीवास्तव, विशालभाऊ ढवळे हे घटना स्थळी गेले. पिल्लाला उपचारासाठी वन्यजीव सोयरेने ताब्यात घेतले.
खारुताईचे पिल्लू उपचारानंतर बरे झाल्यावर डॉ.लता बाहेकर यांच्या अंगणात खारुताईच्या पिल्लाची घर वापसी केली. हा आनंद वेगळाच होता.”प्रत्येक मानवाने मूके पक्षी, वन्यजीव अड़चणीत असल्यास थोड़ी तत्परता दाखवावी तसेच संकटातुन काढ़ायचा प्रयत्न करावा.” असे आवाहन वन्यजीव सोयरे नितिन श्रीवास्तव यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!