spot_img
spot_img

रात्री पावणेदोनला घरात शिरली काळी सावली… महिलेची किंकाळी फुटली अन् काही क्षणांत मलकापूरच्या वडगावातील तीन घरांमागचं धक्कादायक सत्य समोर आलं!

मलकापूर ग्रामीण (हॅलो बुलढाणा) मध्यरात्रीची गाढ झोप… घराचा दरवाजा उघडा… अन् अचानक काळी टी-शर्ट, हाफ चड्डी आणि तोंडाला रुमाल बांधलेली रहस्यमय सावली घरात शिरली! महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून चोरटा अंधारात गायब झाल्याची भयावह घटना वडगाव परिसरात घडली. महिलेच्या जोरदार किंकाळीने संपूर्ण गाव दहशतीखाली आले.

दिनकर निनाजी भगत हे पत्नीसमवेत घरात झोपलेले असताना रात्री पावणेदोनच्या सुमारास त्यांच्या पत्नीला गळ्यातील पोत तुटल्याचे जाणवले. भगत यांनी जागे होताच तोंड झाकलेला एक इसम घराबाहेर पळताना पाहिला. पोतीतील सुमारे सहा ग्रॅमचे १९ सोन्याचे मणी चोरट्याने लंपास केले.

या घटनेनंतर गावकरी जमा झाले असता आणखी दोन घरे फोडल्याचे समोर आले. सविता राखोंडे यांच्या घरातून गहू, चांदीच्या पाटल्या व सोन्याच्या बाळ्या, तर गजानन बोदवडे यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि १५ हजारांची रोकड चोरीला गेली.

एकाच रात्री तीन घरांवर धाड टाकून अज्ञात चोरट्याने तब्बल ५८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. काळ्या कपड्यातील तो रहस्यमय चोरटा कोण? तो एकटाच होता की टोळी सक्रिय आहे? या प्रश्नांनी परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!