spot_img
spot_img

खामगावच्या मोठ्या देवीच्या दरबारात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कुटुंबातील ‘या’ व्यक्तीची हजेरी!

खामगाव (हॅलो बुलढाणा) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू तथा माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी आज, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी खामगावातील श्री जगदंबा (मोठी देवी) मातेचे दर्शन घेतले. त्यांच्या या भेटीप्रसंगी जगदंबा मातेच्या सेवाधारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. दर्शनानंतर सेवाधारी मंडळाच्या वतीने शोभाताईंचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आशिष सराफ, अनंत रंगदळे, विजय शर्मा, अल्का रंगदळे, शिवाजी आनंदे, अगिनकर, राजेश शर्मा, दिलीप माडीवाले आणि संतोष वेरूळकर उपस्थित होते. श्री जगदंबा मातेचे दर्शन आणि सेवाधारी मंडळाकडून झालेला सन्मान अशा स्वरूपात शोभाताईंची ही भेट पार पडली. या भेटीत दर्शनासोबतच मंडळाच्या वतीने त्यांच्या स्वागताचा मानही देण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!