spot_img
spot_img

बुलढाण्यात बनावट तेलाचा काळा धंदा उघड! बिरसिंगपूरच्या बालाजी इंडस्ट्रीजवर FDA चा छापा, ११.२१ लाखाचा साठा सील, परवाना थेट निलंबित!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिवाळी सणाच्या तोंडावर बुलढाणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या तेल माफियांवर अखेर FDA ने बडगा उगारला आहे! बिरसिंगपूर परिसरातील मे. बालाजी इंडस्ट्रीज या खाद्यतेल रिपॅकिंग कारखान्यात मोठा घोळ सुरू असल्याचे उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी (२८ ऑक्टोबर) धाड टाकत तब्बल ६,२२६ किलो तेलाचा ११,२१,७५६ रुपयांचा साठा जप्त केला आणि परवाना जागेवरच निलंबित केला आहे.तेलांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून अहवाल येईपर्यंत हा पूर्ण साठा सील करण्यात आला आहे. स्वतःच्या किंवा NABL लॅबमध्ये तेल तपासल्याचा एकही पुरावा कंपनी देऊ शकली नाही.

▪️सणासुदीत विषारी तेलाचा खेळ?

तपासणीत जे समोर आले ते संतापजनक आहे. कारखान्यात प्रचंड अस्वच्छता,
तांत्रिक व्यक्ती गायब, FoSTaC प्रशिक्षित कर्मचारीच नाही,कीटक नियंत्रण नाही, सुरक्षा आराखडाच नाही, टाक्या कधी धुतल्याचा रेकॉर्ड नाही, पॅकिंग साहित्याला फूड ग्रेड प्रमाणपत्रच नाही, कच्चा-तयार माल थेट जमिनीवर व
सर्वात गंभीर बाब म्हणजे, याच आवारात शेंगदाण्याच्या टरफलांपासून ब्रिकेट बनवण्याचे काम सुरू होते. त्यातून उडणाऱ्या बारीक धुळीमुळे हेच तेल दूषित होऊन थेट तुमच्या-आमच्या ताटात जाणार होते.

▪️किती तेल जप्त झाले?

1) रिफाइंड सोयाबीन तेल – ३,७७१.२६ किलो – ६,६३,०६३ रु.
2) रिफाइंड सूर्यफूल तेल – २,४५५.४० किलो – ४,५८,६९३ रु.
3)एकूण – ६,२२६.६६ किलो – ११,२१,७५६ रु.

▪️मुंढेंच्या आदेशावरून कारवाई!

ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि अमरावतीचे सहआयुक्त एस. डी. केदारे यांच्या मार्गदर्शना खाली, सहायक आयुक्त प्र. शि. पाटील यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अ. सं. भोपाळे यांनी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!