spot_img
spot_img

चिखलीत देवी दर्शनाला जाणाऱ्या दाम्पत्याला अडवून जीवे मारण्याची धमकी! चाकू धाक दाखवून दिरालाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा धाक!

चिखली (हॅलो बुलढाणा) अमडापूर येथे देवी दर्शनासाठी जात असलेल्या दाम्पत्याची गाडी अडवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना खटकेश्वर महाराज मंदिराजवळ, चिखली येथे दि. 27 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप. नं. 925/26 कलम 127(1), 3(5), 251(2) BNS अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,
फिर्यादी सौ. पूजा सुशांत तांगडे (वय 33, व्यवसाय – घरकाम, रा. जिजाऊ नगर, चिखली) ह्या आपले पती सुशांत तांगडे यांच्यासह अमडापूर येथे देवी दर्शनासाठी जात होत्या.
त्यावेळी आरोपी सचिन सुधाकर तांगडे (रा. चिखली) याने त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच चाकू दाखवून फिर्यादी व त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.
इतकेच नाही तर फिर्यादीचे दिर डॉ. प्रशांत तांगडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर फिर्यादीने तात्काळ चिखली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!