अमडापूर (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) डोंगरशेवली शिवारातील दरी-खोऱ्यात, जंगलाच्या आडोशाला सुरू असलेला अवैध हातभट्टी दारूचा अड्डा अमडापूर पोलिसांनी उद्ध्वस्त केला. आज दिनांक 09 जुलै 2026 रोजी गोपनीय माहिती मिळताच अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयसिंग राजपूत यांनी पथकासह थेट जंगलात धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच परिसरात एकच खळबळ उडाली.
या कारवाईत डोंगरखंडाळा येथील रेखाबाई सुनील पवार आणि मंगलाबाई गणेश पवार यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. रेखाबाई पवार यांच्याकडून 14 लिटर हातभट्टी दारू, किंमत अंदाजे 600 रुपये व इतर मुद्देमाल 3 हजार 430 रुपये जप्त करण्यात आला. तर मंगलाबाई पवार यांच्या ताब्यातून 14 लिटर हातभट्टी दारू, किंमत अंदाजे 700 रुपये व इतर मुद्देमाल 3 हजार 650 रुपये जप्त करण्यात आला. हातभट्टी दारू व सडवा पोलिसांनी जागेवरच नष्ट केला.
ही कारवाई ASI निवृत्ती चेके, पोलीस हवालदार बिलगे, पोलीस शिपाई चंद्रशेखर मुरडकर, दुर्गासिंग ठाकूर, रंजीत सरोदे, चालक चिंचोले व महिला अंमलदार वैशाली आराख यांच्या पथकाने केली. दोन्ही महिला आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास ASI निवृत्ती चेके करीत आहेत.












Total Users : 3418054