बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील जयस्तंभ चौक परिसरात दुर्दैवी अपघाताची घटना घडली असून, या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव रमेश सर्जेराव, वय ५६ वर्षे, रा. पांगरी, हल्ली मुक्काम धाड नाका, बुलढाणा असे असल्याचे समजते. ते बस चालक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश सर्जेराव हे त्यांच्या एक्टिवा MH28BD2334 या दुचाकीने जात असताना मागून येणाऱ्या बोलेरो MH28BB3430 धक्का लागल्याने हा अपघात घडला. अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ गर्दी झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.










