spot_img
spot_img

नांदुराजवळ थरार! नागपूर-जळगाव खाजगी बस बाह्यवळणावर पलटी; 10 ते 12 प्रवासी जखमी, जीवितहानी टळली

नांदुरा (हॅलो बुलढाणा) नांदुराजवळील बाह्यवळण मार्गावर आज भीषण अपघाताची घटना घडली. नागपूरहून जळगावकडे जाणारी एक भरधाव खाजगी प्रवासी बस अचानक पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात अंदाजे 10 ते 12 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये आरडाओरड सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तात्काळ बाहेर काढून नांदुरा तसेच खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून काहींवर पुढील उपचार सुरू आहेत.

दरम्यान, बस भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले असावे, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.या भीषण अपघातात बस पूर्णपणे पलटी झाली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!