spot_img
spot_img

BREAKING जळगाव जामोद ‘शीरविहीन मृतदेह’ प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; जिची हत्या झाली तीच मुलगी जिवंत! मग सापडलेला मृतदेह कोणाचा? नेमकं काय आहे हे गूढ?

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) काही दिवसांपूर्वी जळगाव जामोद परिसरात सापडलेल्या शीरविहीन तरुणीच्या मृतदेहामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करत बुलढाणा LCB ने मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातून एका तरुणीच्या वडिलांना आणि भावाला ताब्यात घेतले होते. संबंधित तरुणीची हत्या करून मृतदेह फेकल्याचा गंभीर संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र आता या प्रकरणात असा धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे, ज्यामुळे संपूर्ण तपासावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ज्या मुलीचा मृतदेह असल्याचा दावा केला जात होता, ती मुलगी चक्क जिवंत असल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुणी स्वतः बऱ्हाणपूर पोलिसांसमोर हजर झाली असून “मी जिवंत आहे, माझ्या वडिलांना आणि भावाला सोडा,” अशी आर्त मागणी तिने केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या तिला बऱ्हाणपूर येथील ‘सखी वन स्टॉप सेंटर’मध्ये ठेवण्यात आले आहे.

या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. जळगाव जामोद येथे सापडलेला तो शीर नसलेला मृतदेह नेमका कोणाचा होता? DNA अहवाल येण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्याची घाई का केली? केवळ संशयाच्या आधारावर तपासाची दिशा ठरवण्यात आली का? की या प्रकरणामागे आणखी एखादे मोठे गूढ दडलेले आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

या धक्कादायक घडामोडीनंतर बुलढाणा LCB च्या तपास पद्धतीवर नागरिकांकडून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता खरी मृत व्यक्ती कोण, तिची ओळख काय आणि खरे आरोपी कोण आहेत, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!