spot_img
spot_img

“मी शेंदूरजनचा आहे…” म्हणणारे वृद्ध बाबा बुलढाण्यात सिव्हिलमध्ये दाखल; नातेवाईकांचा शोध सुरू!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात माणुसकीचे हृदयस्पर्शी दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या एका वृद्ध बाबांना अत्यंत गंभीर अवस्थेत हॉस्पिटलसमोर बसलेले पाहून नागरिकांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला. शहरातील नयन मंदिर ऑप्टिकलजवळ हे वृद्ध बाबा अशक्त अवस्थेत आढळून आले. याबाबत ममता महाजन मॅडम यांनी माहिती देत तातडीने मदतीचे आवाहन केले.

ममता महाजन यांनी स्वतः त्या वृद्धांना पाणी व जेवण देऊन आधार दिला. मात्र बाबांची प्रकृती अत्यंत खालावलेली असल्याने सेवा Group तर्फे त्वरित रेस्क्यू मोहीम राबवून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलच्या OPD मध्ये दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, हे बाबा व्यवस्थित बोलू शकत नव्हते, चालण्याचीही त्यांची ताकद संपली होती. त्यांनी मागील तीन ते चार दिवसांपासून काहीही अन्न खाल्ले नसल्याची माहिती दिली.

बाबांच्या म्हणण्यानुसार ते शेंदूरजन येथील असून त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जनहितार्थ आवाहन करण्यात येत आहे की, जर कोणाला हे वृद्ध बाबा ओळखीचे वाटत असतील तर त्यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधावा. माणुसकी जपण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज असल्याची भावना यानिमित्त व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!