बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात आज “गो-सन्मान आवाहन अभियान” अंतर्गत भव्य रॅली आणि निवेदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला शिवप्रेमी, गोभक्त आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद लाभला.
सकाळी १० वाजता जिजामाता प्रेक्षागार येथून रॅलीची सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गांवरून मोठ्या उत्साहात ही रॅली तहसीलदार कार्यालयावर पोहोचली. यावेळी शिष्टमंडळाने प्रशासनाला गोमातेच्या संरक्षण आणि सन्मानाबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
या अभियानात सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी “गोमाता की जय” आणि “गोहत्या बंद करा” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून टाकले. वातावरणात देशभक्ती आणि धार्मिक भावनेचा उत्साह स्पष्टपणे जाणवत होता.
अभियानाच्या प्रमुख मागण्यांमध्ये संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा कडक कायदा लागू करणे, गोमातेला ‘राष्ट्रीय धरोहर’ किंवा ‘राष्ट्रमाता’ म्हणून मान्यता देणे तसेच केंद्र स्तरावर स्वतंत्र ‘गो-मंत्रालय’ स्थापन करणे यांचा समावेश आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजात गो-संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि गोमातेचा सन्मान टिकवून ठेवणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले










