सोनाळा (हॅलो बुलढाणा) समाजकारणाला प्राधान्य देत “आमदार नव्हे, सेवेकरी” ही भावना जपणारे आ. डॉ. संजय कुटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पितृछत्र हरवलेल्या पल्लवी या मुलीचे त्यांनी सहपत्नीक कन्यादान करत मानवतेचा अनोखा आदर्श घालून दिला. संत नगरी काटेल येथे १० एप्रिल रोजी तब्बल २ हजार वऱ्हाडींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा दिमाखात पार पडला.
पल्लवीचे वडील दिलीपराव काळमेघ यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या या कुटुंबाला डॉ. कुटे व डॉ. अपर्णाताई कुटे यांनी आधार देत पल्लवीला दत्तक घेतले. केवळ दत्तकच नव्हे, तर तिच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी उचलून त्यांनी पित्याची उणीव भरून काढली.
विवाह सोहळ्यात भावनिक क्षणांचा संगम पाहायला मिळाला. एका बाजूला वडिलांच्या आठवणींचे दुःख, तर दुसरीकडे नवजीवनाची सुरुवात… अशा वातावरणात उपस्थितांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले. कुटे दाम्पत्याच्या या कार्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघात माणुसकीचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित झाला आहे.











Total Users : 3369996