नांदुरा (हॅलो बुलढाणा/महेंद्र मिश्रा) नांदुरा येथे ‘हनुमान जयंती व ब्रह्मोत्सव 2026’ महोत्सव प्रचंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. स्वर्गीय शिवराम मोहनराव यांनी स्थापन केलेल्या बालाजी संस्थानच्या माध्यमातून 2001 साली उभारण्यात आलेली 105 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती आजही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विशेष म्हणजे, या मूर्तीची 2003 साली लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती म्हणून नोंद झाली आहे.
यंदा प्राणप्रतिष्ठेला 25 वर्षे पूर्ण होत असल्याने महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आज हनुमान जयंतीनिमित्त सकाळी विधिवत जलाभिषेक करण्यात आला, तर 350 किलो फुलांचा भव्य हार रिमोट कंट्रोलद्वारे अर्पण करण्याचा अनोखा सोहळा भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरला.
संस्थानतर्फे 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान अखंड होमहवनाचे आयोजन करण्यात आले असून, आज 2 एप्रिल रोजी मुख्य सोहळा पार पडत आहे. सायंकाळी शहरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेत राज्यभरातून आलेले हजारो भक्त सहभागी होणार असून, नांदुरा नगरी पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.










Total Users : 3269495