spot_img
spot_img

बुलढाण्यात भ्रष्टाचाराचा बॉम्ब! अप्पर कोषागार अधिकारीसह तिघे ACB च्या जाळ्यात

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा कोषागार कार्यालयात भ्रष्टाचाराचे घाणेरडे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. केवळ एक महिन्यापूर्वीच पदभार स्वीकारलेले अप्पर कोषागार अधिकारी प्रवीण मुंडे, सह कनिष्ठ लेखापाल विनोद घट्टे आणि कनिष्ठ लिपिक जीवन काळे यांना पेन्शन प्रकरण मंजूर करण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे.

पेन्शन मंजुरीसारख्या संवेदनशील आणि गरजेच्या कामासाठी थेट पैशांची मागणी केल्याने संतापाची लाट उसळली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या या अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या विश्वासालाच तडा दिला आहे. तक्रारदाराकडून ठरलेली रक्कम स्वीकारताना ACB ने सापळा रचून ही कारवाई केली.

विशेष म्हणजे, नुकतेच रुजू झालेले वरिष्ठ अधिकारीही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले असल्याने प्रशासनातील नैतिकता आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, “पेन्शनसाठीही पैसे द्यावे लागणार का?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. ACB कडून पुढील चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!