चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील अंबाशी फाटा येथे आज दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला
मृतकाचे नाव राम सुरेश राठोड (वय 27, रा. सावतबारा देवारी, ता. सोयगाव, जि. संभाजीनगर) असे असून ते देवारी येथून मांडवा येथे मौती कार्यक्रमासाठी जात होते. त्याचवेळी चिखली-मेहकर रोडवरील अंबाशी फाटा येथे टाटा इंडिका विस्टा (क्र. एमएच 37 जी 4837) या चारचाकी वाहनाने त्यांच्या हिरो स्प्लेंडर (क्र. एमएच 20 एचएम 1329) दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जबरदस्त होती की राम राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.










Total Users : 3290847