पिंपळगाव सरांई (हॅलो बुलडाणा/ सचिन जयस्वाल) सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा दर्गा येथे होणाऱ्या सैलानी बाबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कडक तयारी सुरू केली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट स्थळावर धडक देत पाहणी केली.
निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, रायपूर ठाणेदार निलेश सोळंके व दुर्गेश राजपूत यांनी संदल घर, मिरवणूक मार्ग व दर्गा परिसराची सखोल तपासणी केली. मिरवणूक मार्गावरील अडथळे तात्काळ दूर करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या.
दर्गा परिसरात सीसीटीव्ही, दर्शन रांग नियोजन, तसेच कडक बंदोबस्ताबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले. होळीचे पारंपरिक स्थळ, झिरा परिसर व वाहन पार्किंग व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली.यात्रा सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून भाविकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











Total Users : 3370293