मोताळा (हॅलो बुलडाणा) एका भूमि लेख अधिका ऱ्याच्या अरेरावी बाबत ‘मुजोरपणा थांबणार कधी? या मथळ्याखाली आज सकाळी सर्व प्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने सडेतोड वृत्त प्रसारीत करताच भूमि अभिलेख उप अधिक्षकांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.जागा मोजणीसाठी एक वर्षा अगोदर केलेल्या अर्जावर कारवाही न केल्याने वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या भूमिलेख कार्यालयातील मोजणी सुनिल जाधव या अधिकाऱ्याने एका महिलेशी अरेरावी करीत नाहक त्रास दिला असून महिलेने या मोजणी अधिकाऱ्याची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी यांच्याकडे व्हिडीओ द्वारे केली. वर्षभरापासून मोजणी अधिकारी जाधव ‘तारीख पे तारीख’ देत असल्याने त्रस्त महिला व तिचा मुलगा रवींद्र मोरे यांनी जाधव यांना जाब विचारला असता, ‘तुम्हा जे करायचे ते करून घ्या..’ अशी उर्मट उत्तर देत कार्यालयाबाहेर हाकलून देत महिलेला जाधव यांनी अपमानीत केले होते.या बाबतची बातमी ‘हॅलो बुलढाणा’ ने सर्व प्रथम प्रसारीत करताच भूमि अभिलेख उपअधीक्षक विजय सवटकर यांनी जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
- Hellobuldana