बुलढाणा (हॅलो बुलडाणा) दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील व विजयी स्पर्धकांचा ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉन व बुलडाणा अर्बन परीवाराच्या वतीने सत्कार समारंभ साईकृपा लॉन्स, बुलडाणा येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी हे होते. याप्रसंगी श्री राधेश्याम चांडक यांनी बोलताना सांगितले की, बुलडाण्यातील खेळाडू मध्ये प्रतिभेची कमतरता नाही. केवळ त्यांना संधी मिळण्याची आवश्यकता आहे. तसेच जिल्हयाच्या मातीत तयार होणारे अनेक खेळाडू हे आता जागतिक पातळीवर पोहचत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड सारखी खडतर स्पर्धेत यशस्वी होणे हा साधा विषय नाही. हि कॉर्मेड मॅरेथॉन म्हणजे मानसिक आणि शारीरिक निरिक्षण आणि परिक्षण होय. या स्पर्धेसाठी बुलडाण्याच्या मातीत अशी खेळाडू तयार होत आहे, त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी बुलडाणा अर्बन सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले. बुलडाणा येथे आयोजित सत्कार समारोह प्रसंगी बोलत होते. नुकतेच दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार साेहळा पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानगंगा फॉरेस्ट ग्रुप व बुलडाणा अर्बनच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. कॉम्रेड मॅरेथॉन ही दक्षिण आफ्रिका येथे 99 वर्षा पासून आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धा ही 90 km चे अंतर हे 12 तासाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. अतिशय खडतर अशी ही स्पर्धा असते. या स्पर्धेत राज्यातील पाच जणांनी यश मिळवले आहे, यात बुलडाणा जिल्ह्यातील चार स्पर्धकांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये डॉ. विजय वाघ, महेश महाजन, संतोष जाधव, अश्विनी जाधव, योगेश सानप यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील राहणारे योगेश सानप यांनी ही स्पर्धा 7 तास 26 मिनिटात पूर्ण करून सिल्वर मेडल मिळवले.
या सर्व कॉम्रेड मॅरेथॉन रनरचा सत्कार बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते पार पडला. पुढे बोलतांना चांडक म्हणाले की, कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा ही स्पर्धकांच्या मनाचा व शरीराचा शरीराच्या मर्यादेचं परीक्षण आहे. असे स्पर्धक बुलढाण्यामध्ये अधिकाधिक तयार व्हावेत व त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी बुलढाणा अर्बन सदैव तयार राहील. त्याच प्रमाणे बुलढाणा अर्बन च्या माध्यमातून बुलडाणा येथे मॅरेथॉन स्पर्धा भरवण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले. यावेळी कार्यक्रमात नितीन चौधरी, सौ अनुजाताई सावळे, डॉ योगेश गोडे, प्रशांत शिंदे, डॉ खरात, ॲड.लहाने, संजय घवाळकर आदी उपस्थित होते.
▪️बुलडाणा ते पंढरपूर सायकल वारीला गेलेल्यांचा या वेळी सत्कार…
बुलडाणा ते पंढरपूर 450 कि.मी.पर्यंत सायकल वारीला गेलेले 65 सायकलवारीचा बुलडाणा अर्बन वतीने गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सायकल पटू संजय मयूरे, दिपक क्यावल,सरदारसिंग ठाकुर, संदिप राजपूत,सुरज पवार, कैलास जैस्वाल, डॉ अनिल साळोख, प्रमोद गवळी, मधुकर राजपूत, संदीप मुंढे,आदींची उपस्थिती होती.