बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अतिवृष्टीमुळे जानेफळ- मेहकर व जानेफळ- खामगाव रस्त्यावरील नदी नाल्यांना पूर आल्याने मेहकर ते शेगाव जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. लोणारमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असून, डोणगावातही पावसाचा कहर आहे.नदी नाले तुडुंब भरले असून,अनेक गावांचे संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.कांचन नदीला पूर आल्यामुळे मालेगाव वाशिम रस्ता बंद झाला आहे.
लोणार शहरात व तालुक्यात मुसळधार पावसामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वडगाव तेजनकर गावाला अक्षरक्षः झोडपले आहे. शिवाय संततधार पावसामुळे डोणगाव व ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे डोणगाव व ग्रामीण भागाचा संपर्क तुटल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मादणी, शेलगाव देशमुख,आरेगाव, बेलगाव,गोहेगाव, राजगड,जनुना, विठ्ठलवाडी, पांगरखेड,विशवी, कनका व इतर गाव खेड्याचा संपर्क तुटल्यामुळे तसेच नदी नाल्यांना पूर आल्यामुळे ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे डोणगाव येथील कांचन नदीला पूर आल्यामुळे मालेगाव वाशिम रस्ता बंद झाला आहे.या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे या संदर्भातील अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती.