चिखली (हॅलो बुलडाणा /सय्यद साहिल) चिखली तालुक्यातील मेरा चौकी परिसरात भरदिवसा निर्घृण खून झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. भारत विरशिद (वय 24, रा. नांद्रकोळी) या युवकाची आज दुपारी सुमारे अडीच वाजता अमानुष हत्या करण्यात आली. अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांपुढे कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.घटनास्थळी अंढेरा पोलिसांचा ताफा तातडीने दाखल झाला असून, तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. मृत युवक नेमका कोण होता? तो त्या ठिकाणी कशासाठी आला होता? कोणाशी वाद होतं का? त्या वेळी आसपास कोण होते? – या प्रत्येक मुद्द्यांवर सखोल चौकशी सुरु आहे.
हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली आहे, ती पाहता पूर्वनियोजित कटाचा संशय गडद होत आहे. परिसरात घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून संताप व्यक्त केला आहे.अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत यापूर्वीही गुन्हेगारी प्रकार घडले असून, आता थेट खून झाल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. काही नागरिकांनी खुल्या शब्दांत विचारलं