spot_img
spot_img

💥भय इथले संपत नाही! थेरड्याच्या विनयभंगानंतर आता विधी संघर्षित मुलाने केला 7 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग! – पाच महिन्यात 19 बालीका गेल्या कुठे?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात त्यांच्याच लेकी सुरक्षित नसल्याचे अस्वस्थ चित्र आहे. पाच महिन्यात जिल्ह्यातील 67 मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी आहे.त्यातच तीन दिवसाआधी एका बुरुड नामक सावकार थेरड्याने पैशाच्या व्याजा पायी एका मुलीची छाती दाबून विनयभंग केल्याची घटना घडली.त्या पाठोपाठ आणखी एक लज्जास्पद घटना घडली असून,एका विधी संघर्षित बालकाने सात वर्षे बालीकेवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

बुलढाणा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अकरा वर्षीय अल्पवयीन मुलाने सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना घडली.याप्रकरणी आईच्या तक्रारीवरून रायपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद झाली आहे. आरोपी बालक हा वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एका गावाचा मूळ रहिवासी आहे. काही काळापासून पीडित मुलगी आणि आरोपी बालक हा सध्या रायपूर पोलीस ठाणे हद्दीत राहत होता. दरम्यान 17 जून रोजी आरोपी बालकाने सात वर्षीय बालिकेवर लैंगीक अत्याचार केला. यापूर्वीही असा प्रकार त्याने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी रायपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.तीन दिवसाआधी सुनिल बुरुड या थेरड्याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. अवैध सावकारीचा पाश जखडून त्याने अनेक गुन्हे केले.कर्जाच्या व्याजापायी कर्जदार महिलेच्या मुलीला परराज्यात विकण्यापर्यंत त्याची मजल गेली.याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी आता आवाज उठवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुली व महिला सुरक्षिततेचा मुद्दा एरणीवर आला आहे.

▪️5 महिन्यात 19 बालीका गेल्या कुठे?

जिल्ह्यात जानेवारी ते मे दरम्यान 469 मुली व महिला बेपत्ता झाल्यात. यापैकी 308 मुली व महिलांचा शोध लावण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळाले आहे. जानेवारी ते मे महिन्यात एकूण 67 मुली बेपत्ता झाल्याने अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले.यापैकी 48 अल्पवयीन मुलींना शोधून काढण्यात आले. 19 अल्पवयीन मुलींचा अद्यापही शोध लागला नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!