बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून राज्यातील हजारो आशा व गटप्रवर्तकांचे मानधन थकीत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध आरोग्याच्या योजना तळागाळा पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या जिवाची परवा न करता दिवसरात्र काम करतात त्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या कामाचा मोबदला जर प्रशासन जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवत असेल तर हे आम्ही सरकारचे कटकारस्थाने हाणून पाडल्या शिवाय राहणार नाही. संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात तालुका आरोग्य कार्यालय एवढेच नव्हे तर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा ९ जुलै रोजी काढण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी सरकारला दिला आहे.
देशाचे आयुष मंत्रालय तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव हे बुलडाणा येथे १७ जून रोजी आले असता सीआयटीयूचे,सीटूचे जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेचे शिष्टमंडळ यांनी त्यांची जिल्हा अधिकारी कार्यालय येथे प्रत्येक्ष भेट घेऊन मा.मंत्रीमहोदया सोबत आपल्या मागण्या बाबत सविस्तर चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार आपल्या गलथान कारभाराकडे दुर्लक्ष करीत आहे.केंद्र सरकारने मागील वर्षी एन एच एम मधील कंत्राटी कामगार, आशा व गटप्रवर्तकांच्या पगारासाठी जो आपला निधी पाठविला त्याचा विनियोग राज्य आरोग्य विभागाने भलत्याच गोष्टी साठी खर्च केला.त्याचे विनियोग प्रमाणपत्र राज्य आरोग्य प्रशासनाने केंद्र सरकारकडे पाठविणे अपेक्षित होते.ते न पाठविल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असे मंत्री महोदयांनी सांगितले.त्याचा परिणाम म्हणून चालू आर्थिक वर्षात ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांसह इतर कंत्राटी कामगारांना गेल्या जानेवारी २०२५ पासून जवळ पास ५ ते ६ महिन्यांपासून आपल्या हक्काच्या मोदल्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.आरोग्य विभागाने तातडीने आशा व गटप्रवर्तकांचे थकित मानधन अदा करावे. अन्यथा संघटनेला काम बंद आंदोलन केल्या शिवाय पर्याय राहणार नाही. या वेळी संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी मंत्रीमहोदयां सोबत झालेल्या प्रत्यक्ष भेटीत सरकारला इशारा दिला. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी विजया ठाकरे, रेखा इंगळे, अर्चना मोरे,संगिता मोरे इत्यादि उपस्थित होत्या.