बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात अत्यंत परिचित चेहरा आणि शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे राज (राजू) आयोध्याप्रसाद तिवारी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाले. वयाच्या केवळ 42व्या वर्षी आयुष्याचा हा धक्का अनपेक्षित ठरला असून, त्यांचं जाणं हे त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारासाठी मोठा आघात आहे.
नेहमी हसतमुख, परंतु मितभाषी राहणाऱ्या राजू तिवारी यांची ओळख शहरातील प्रत्येक वयोगटातील नागरिकांमध्ये होती. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय होता. त्यांच्या अचानक जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे. आज 12 वाजेपासून पासूनच त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अनेकांनी त्यांच्या राहत्या घरी धाव घेतली.हृदय विकाराचा झटका एवढा तीव्र होता की त्यांना वाचवणं शक्य झालं नाही. त्यांच्या जाण्याने एक सुसंस्कृत, शांत, सेवाभावी व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. बुलढाण्याच्या सामाजिक जीवनात ही एक मोठी पोकळी आहे.
टीम ‘हॅलो बुलडाणा’ कडून स्व.राज तिवारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!