बुलढाणा (हॅलो बुलडाणा) एका ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जमानत मंजूर झाल्याचा निर्णय जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे.हकिकत अश्या प्रकारे आहे की, निवांत हॉटेल अजिंठा रोड, बुलडाणा येथे झालेल्या वादातून तथाकथित पोलिस स्टेशन बुलडाणा (शहर) येथे कलम 118(1) , 3(5) BNS Act व 3(1)(r)(s) , 3(2)(v) ॲट्रॉसिटीच्या कलमांतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीच्या वतीने अॅड.श्रीवेद प्र. इंगळे यांनी विद्यमान सत्र न्यायालय , बुलडाणा अटकपूर्व जमानत दाखल करण्यात आला होता. त्यावर 11-06-2025 रोजी न्यायालयात सूनावणी दरम्यान आरोपीच्या वतीने अॅड.श्रीवेद प्र. इंगळे यांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविले असल्याचा प्रभावी युक्तिवाद सादर केला, तो न्यायालयाने ग्राह्य मानून आरोपीचा अटकपूर्व जमानत अर्ज मंजूर केला. आरोपीच्या वतीने अॅड.श्रीवेद प्र. इंगळे यांनी काम पहिले.
- Hellobuldana