spot_img
spot_img

💥EXCLUSIVE माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बंगल्यात स्फोट! फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा ब्लास्ट; मोठा अनर्थ टळला

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बुलडाण्यातील चिखली रोडवरील भव्य बंगल्यात मंगळवारी (18 जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोठा अनर्थ टळला. बंगल्यातील किचनमध्ये असलेल्या फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा अचानक भीषण स्फोट झाला, त्यामुळे आगीचा भडका उडाला!

सुदैवाने घटनेच्या वेळी बंगल्यात फक्त वॉचमन उपस्थित होता. अन्य कोणीही नसल्यामुळे मोठा जीवितहानी टळली. स्फोट इतका जबरदस्त होता की काही क्षणांतच परिसरात धावपळ उडाली. आवाजामुळे नागरिकांची एकच गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा ब्लास्ट नेमका कशामुळे झाला, याचा तपास अद्याप सुरू आहे. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, उच्चभ्रू वस्तीत घडलेला हा स्फोट किती गंभीर ठरू शकला असता, याचा प्रत्यय नागरिकांना आला.डॉ. शिंगणे हे त्या वेळी बंगल्यात उपस्थित नव्हते, ही बाब नशीब समजली जात आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाने तत्काळ प्रतिसाद दिल्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. आता संपूर्ण परिसरात या घटनेची चर्चा सुरु आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!