चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना अमडापूर पोलिस ठाणे हद्दीत आज दुपारी घडली आहे. राजनंदीनी निंबाजी नाटेकर वय 10 रा. बीबी आणि तिची आते बहीण वैष्णवी महादेव खंडारे वय 17 रा. कवळा ता. चिखली असे मृतकांची नावे आहेत.राजनंदीनी निंबाजी नाटेकर ही इयत्ता पाचवीत शिकत होती. ती लग्ना निमित्त नायगाव येथील काकाच्या घरी गेली होती. राजनंदीनी व तिची आते बहीण वैष्णवी ह्या दोघी दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान त्यांच्यावर नियतीने डाव साधला. त्या दोघीही नदीत बुडाल्याने त्यांचा करुण अंत झाला आहे. त्यांचे मृतदेह चिखली रुग्णालय येथे नेण्यात आले आहेत.
- Hellobuldana