बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अवैध धंदे फोफावल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अवैध व्यवसायीकां विरुद्ध जणू काही धडक मोहिमच उघडली.एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे नेतृत्वाखाली पथकाने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून तब्बल 8,57,151 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अवैध देशी विदेशी दारू,गावठी हातभट्टी दारू, जुगार, प्रतिबंधित गुटखा व इतर बेकायदा धंदा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्य एलसीबीच्या पथकांनी
जुगार 4, दारूबंदी 2, गुटखा प्रकरणी 1 केस केली आहे. ही कारवाई बुलढाणा ग्रामीण, जळगाव जामोद शिवाजीनगर खामगाव, देवूळगाव राजा, मलकापूर पोलीस ठाणे हद्दीत करण्यात येऊन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत 16 जून रोजी राजू मधुकर काळे राहणार उटी मेहकर हा निंबा फाटा जानेफळ येथून जात असताना त्याला एलसीबी पथकाने पकडले.वाहनाची झळाझडती घेतली असता 4,18,796 रुपये किमतीचा गुटखा व वाहन मिळून एकुण 8,18,796 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इतरही 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले.