spot_img
spot_img

💥BREAKING धोत्रानांदाईत ट्रॅक्टरचा थरार! वीस मेंढ्यांचा जागीच मृत्यू – दोन मेंढपाळ जखमी

धोत्रानांदाई ता चिखली (हॅलो बुलडाणा) गावातली शांतता एका सुसाट वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडली! आज सोमवारी दुपारच्या सुमारास धोत्रानांदाई शिवारात रस्त्यावरून भरधाव वेगात जात असलेला ट्रॅक्टर अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि बाजूने चालत असलेल्या मेंढपाळांच्या कळपावर धडकला. या भीषण घटनेत तब्बल २० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, सुरेश मोरे व सुनील मोरे हे दोघे मेंढपाळ गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रॅक्टर सुमित ढाकणे हे चालवत होते, तर मालकाचे नाव विवेक घुगे असे आहे. हे ट्रॅक्टर मावताळा येथून सहस्रमुळीकडे जात होते. त्याचवेळी मेंढपाळ लक्ष्मण खटके यांचा मेंढ्यांचा कळप रस्त्याच्या कडेला चालत होता. अचानक ट्रॅक्टर वेगात आला आणि थेट कळपाच्या मधोमध घुसला. मेंढ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात सुरेश मोरे व सुनील मोरे ट्रॅक्टरखाली दबले गेले. घटनास्थळी एक तुफान गोंधळ उडाला.अपघातानंतर ट्रॅक्टर पलटी झाला असून त्यात चालक व मालकही किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेने शेतकरी व मेंढपाळांमध्ये संतापाची लाट उसळली असून, जबाबदारांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!