मेहकर (हॅलो बुलडाणा) ग्रामपंचायत अधिकाऱ्यासह बाल संरक्षण समिती सदस्य व चाईल्ड हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कामात अडथळा आणून अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी मोहोतखेड येथील एका महिलेसह तिन आरोपी विरुद्ध मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची तक्रार 8 जून रोजी दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, लोणार तालुक्यातील मोहोतखेड येथे ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर किसन पिसे हे कार्यरत आहेत. ते बुलढाणा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या कडून प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावरून कायदेशीर कर्तव्य पार पाडत असताना,तीन आरोपींनी त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. आरोपी शिवाजी निवृत्ती भोपाळे, श्रीमती सिंधू शिवाजी भोपाळे व पवन शिवाजी भोपाळे या तिघांनी यावेळी ग्रामपंचायत अधिकाऱ्यासह बाल संरक्षण समिती सदस्य व चाईल्ड हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून तलवारीने हातपाय तोडण्याची धमकी दिली.दरम्यान मेहकर पोलिसांनी तीनही आरोपी विरोधात कलम 221, 296, 352,(2), (3), (5) बिएनएस नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.












Total Users : 3427435