लोणार (हॅलो बुलढाणा) हर्राशी झालेल्या लेणार तालुक्यातील खापरखेड लाड शिवारातील वाळू घाटावरून बेकायदेशीरपणे लाखों रुपयांची वाळू चोरणाऱ्या वाळूमाफियांची वाळू भरलेली 6 टिप्पर व 36 ब्रास वाळू असा एकुण 1 कोटी 92 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तीची जम्बो कारवाई बीबी पोलिसांनी केली आहे. याबाबतची तक्रार किनगाव जट्टू साजा येथील प्रभारी ग्राम महसूल अधिकारी निलेश जाधव यांनी दिली आहे. एकुण 12 वाळू चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे वाळूमाफियां मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अलीकडे वाळूमाफीया वाळूची चोरटी वाहतूक करण्यात सैराट झाले आहे. महसूल रूपाने शासनाला कोट्यावधी रुपयांचा चुना लागत असून, या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासन कमी पडत आहे. मात्र 9 सप्टेंबर रोजी बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. प्रभारी ग्राम महसूल अधिकारी निलेश जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,9 सप्टेंबर रोजी 11.45 वाजता उपविभागीय अधिकारी सानप, तहसिलदार पाटील, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी सानप व महसुल सेवक मधुकर मिसाळ, मिलींद चव्हाण सरकारी वाहनाने खापरखेड लाड येथे हर्रास झालेल्या घाटावरील वाळूचा स्टॉकची पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान खापरखेड लाड शिवारात 11.55 च्या सुमारास वाळू घाटावरून एकुण 6 टिप्पर अवैधपणे वाळू भरलेले निदर्शनास आले. यामध्ये 1) MH 28 BB 2130 क्रमांकाच्या टिप्परमध्ये 36,000 रुपये किमतीची 6 ब्रास वाळू व 1500000 . रुपये किंमतीचे वाहन (मालक दिलीप वायाळ व चालक सोनु सुभाष आडे) 2) MH 28 BB 6042 क्रमांकाच्या टिप्परमध्ये 36,000 रुपये किमतीची 6 ब्रास वाळू व 35,00000 रुपये किमतीचे वाहन (मालक रवि बाबुराव जाधव व चालक) 3) MH 28 BA 6042 क्रमांकाच्या टिप्पर मध्ये 36,000 रुपये किमतीची 6 ब्रास वाळू व 35,00000 रुपये किमतीचे टिप्पर ( वाहनाचे मालक रवि बाबुराव जाधव व चालक) 4 ) MH 28 BX 7090 क्रमांकाच्या इतर मध्ये 36,000 रुपये किमतीची 6 ब्रास वाळू व 35,00000 किमतीचे टिप्पर (मालक इम्रान शेख व चालक) तसेच 5) MH 28 CF 0179 क्रमांकाच्या टिप्पर मध्ये 36,000 रुपये किमतीची वाळू व 35,00000 रुपये किमतीचे टिप्पर (मालक अरुण लाड व चालक) 6) MH 28 BB 9925 क्रमांकाच्या टिप्पर मध्ये 36,000 रुपये किमतीची 6 ब्रास वाळू व 35,00000 रुपये किमतीचे टिप्पर ( मालक डॉ. केशव अवचार चालक पंकज भुजंग भालेराव ) अशी वाळू भरलेली 6 टिप्पर व 36 ब्रास वाळू असा एकुण 1 कोटी 92 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या वाळू चोरट्यांना पंचासमक्ष थांबवून त्यांना वाळूची रायल्टी व परवानगी बाबत विचारपुस केली असता त्यांचे जवळ कोणत्याही प्रकारच्या वैध रायल्टी तसेच परवानगी मिळून आली नाही. त्यांना सदर वाळू ही कोठून भरुन आणली? या बाबत विचारपुस केली असता त्यांनी देवी तूळजाइ प्रा. लीमीटेड यांचे मालक डॉ. केशव अवचार यांच्या स्टाक वरुन भरुन आणल्याचे सांगीतले. या सहाही वाहनांचा पंचासमक्ष जप्ती पंचनाना तयार करण्यात आला असून वाहने पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आहोत. आरोपी विरुद्ध विरुध्द कलम 303 (2) बी एन एस. सहकलम 48 (7), 48 (8) गौण खनिज अधीनियम नुसार बीबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वाळू माफियांच्या पायाखालून वाळू सरकली आहे.












Total Users : 3427165