बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातून वाहून जाणारी खडकपूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात अवैधरित्य वाळूची तस्करी सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून याचा परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहे.वाळू तस्करी थांबावी म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे नियमित कारवाया सुरू आहे. बुल डाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी विशेष मोहीम राबवून स्वतः आपल्या पथकासह चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ शिवारात अवैधरित्य रेतीचे वाहतूक करणारे 2 टिप्पर शनिवारी सकाळी 7 वाजता पकडले आहे.यामुळे वाळूमाफियां मध्ये खळबळ उडाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात मागील 2 वर्षापासून एकाही वाळू घाटाचा अधिकृत लिलाव झालेला नाही तरीही बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा आणि पूर्णा या दोन प्रमुख नद्यातून लाखो ब्रास वाळूचा अवैधरित्या उत्खनन करण्यात आलेला आहे.हा अवैध उत्खनन थांबवावा म्हणून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना कारवाया करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यानुसार काल शनिवारी बुलडाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील एक पथक घेऊन चिखली तालुक्यात गस्तीवर असताना त्यांनी शेळगाव आटोळ शिवारात 2 टिप्पर पकडले. चालकांना रॉयल्टी बाबत विचारपूस केली असता त्यांनी कळवा उडवीची उत्तरे दिली यामुळे हे सिद्ध झाले की शासनाचा महसूल चोरून वाळूची अवैध वाहतूक केली जात आहे. दोन्ही टिप्पर पकडून चिखली पोलीस ठाण्यात लावले असून या टिप्पर मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई प्रास्तावित असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली आहे.