मलकापूर (हॅलो बुलडाणा) शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांना दिड कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक 27/03/2025 रोजी कोर्टाच्या कामानिमित्त मलकापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे हजर असताना दुपारी अनेकांच्या समक्ष अकोला येथील राहणारे गणेश उर्फ (बाळू) शंकर धोत्रे, कौलखेड खडकी व दिनकर धोत्रे, गोरक्षण रोड यांनी दिड कोटी रुपयाची मागणी केली असल्याचा आरोप केला आहे. आरोपात म्हटले आहे की, तुझ्याविरुद्ध दाखलकेलेल्या सर्व केसेस मागे घेतो बदल्यात दिड कोटी रुपये आम्हाला दे. पैसे नाही दिल्यास तुला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून टाकू तसेच तुला तलवारीने कापून मारून टाकू असे नमूद आहे.
तसेच मागील दोन महिन्या पासून हे धोत्रे बंधू व इतर दोघांनी यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फोन द्वारे पुन्हा पुन्हा सदर रकमेची पूर्तता न केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील अशी वारंवार धमकी दिली. अशा आशयाच्या फिर्यादी वरून मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे गणेश शंकर धोत्रे, दिनकर धोत्रे व इतर दोघांवर भारतीय न्याय संहिता चे कलम 308(4),351(2),3(5) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.










