spot_img
spot_img

💥’वाह रे पठ्ठयांनो!’ चक्क वकीलासह चौघांनी केली कोर्टाची फसवणूक! – बनावट मुखत्यारपत्र केले सादर!

मेहकर (हॅलो बुलडाणा) बनावट मुखत्यारपत्र न्यायालयात सादर करून न्यायालयाची फसवणूक केल्याने एका वकीलासह 4 जणांवर गून्हा दाखल झाल्याचा प्रकार समोर आला आहे.मुखत्यारपत्र म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला आपल्या वतीने कायदेशीर किंवा आर्थिक निर्णय घेण्यास अधिकृत करण्याची परवानगी देणारा एक कायदेशीर दस्तऐवज आहे.मात्र आरोपी महेश माधव घोडे,शेख कलीम शेख असलम दोघेही रा.मादणी ता. मेहकर, ॲड. विनोद मधुकरराव देशमुख,मो.जहीर मो खलील दोघेही रा. मेहकर यांनी संगणमताने बनावट मुखत्यारपत्र तयार केले व हे बोगस मुखत्यारपत्र त्यांनी न्यायालयात सादर करून न्यायालयाची दिशाभूल केली. याप्रकरणी फिर्यादी मंगेश रमेश चोपडा यांनी फिर्याद दिल्यावरून
मेहकर पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 420,465, 468, 471, 34, 511 बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!