spot_img
spot_img

💥BREAKING! भाऊ -भाऊ वैरी! ‘एक कोटीच्या वादातून एकाचा खून!’ – जिगाव प्रकल्पाचे पैसे जीवावर बेतले!

शेगाव (हॅलो बुलडाणा) भावा-भावात वाद होत असतो परंतु तो इतकाही विकोपाला जाऊ नये! मात्र शेगाव तालुक्यातील माटरगाव बुद्रुक येथे जिगाव प्रकल्पाच्या निधीमुळे भावाने आपल्याच भावाला यमसदनी धाडले आहे.ही घटना भर दिवसा आता थोड्या वेळापूर्वी घडली. शत्रुघ्न मिरगे यांचा भास्थन येथील रहिवाशी भावानेच गेम केला.

जिगांव प्रकल्प मध्ये जमीन गेल्याने दोन्ही भावांना पैसे मिळणार होते. प्रत्येकांचा 1 कोटी 13 लाख असा हिस्सा असल्याचे सांगण्यात येत आहे. ते मिळाले. या पैशाच्या वादातून संशयित आरोपी सोपान मिरगे याने टोकाची भूमिका घेत थेट खूनच करून टाकला. वादा दरम्यान महिला जखमी झालेल्या आहेत.खून करणारा मृताकाचा चुलत भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!