spot_img
spot_img

💥आस्था! ‘रामलल्लां’च्या गजराने राम गल्ली दुमदुमणार! – श्रीराम मारोती संस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा शहराचे अध्यात्मिक वैभव असलेल्या पेठेतील (राम गल्लीतील ) श्रीराम मारुती मंदिर संस्थांनचा वर्धापन दिन शुक्रवार 10 जानेवारी व शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी साजरा करण्यात येत आहे.दरम्यान राम लल्लाच्या गजराने राम गल्ली दुमदुमणार आहे.या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी 8/30 वाजता शांतीपाठ,पुण्याहवाचन व अग्निस्थापना स्वाहाकारास सुरुवात होणार आहे. दुपारी 4 वाजता प्रल्हाद महाराज यांचे आगमन व स्वागत करण्यात येईल.

सायंकाळी 6 वाजता सायं उपासना होईल.
शनिवार दिनांक 11 जाने सकाळी 5 वाजता
श्री रामास व श्री महाराज अभिषेक करण्यात येईल.सकाळी 8 वाजता स्वाहाकार सुरुवात
सकाळी 10 वाजता सामूहिक रामरक्षा श्री मारुती स्तोत्र पठण व श्री राम नामस्मरण पार पडणार आहे. दुपारी 12 वाजता पूर्णाहुती
नैवेद्य व आरती 12/30 ते 2/30 पर्यंत
महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.सायंकाळी 7 वाजता सकल हिंदू समाजा तर्फे महाआरती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थान तर्फे करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!