spot_img
spot_img

💥धक्कादायक! ‘माता नव्हे तू वैरणी!’ ‘त्या पोटच्या गोळ्याला कोणी फेकले?’ – बुलढाणा शहर पोलिसांपुढे तपासाचे आव्हान!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्यभरात स्त्रीभ्रूण हत्याच्या घटनांनी खळबळ माजली असतानाच बुलढाणा शहरातील जेलच्या मागील भागात शेतकी शाळेच्या शिवारात

नवजात पुरुष जातीचे अर्भक फेकून दिल्याचे आढळल्याने संताप व्यक्त होत आहे. नुकतीच ही घटना उघडकीस आली असून हे अमानुष कृत्य करणा-यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. हा तपास करण्याचे आव्हान शहर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

राज्यात स्त्रीभ्रूण हत्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. अत्याचाराच्या घटनांना उधाण आल्याचे भयंकर चित्र दिसते.अशा अनुचित घटनांमध्ये बुलढाणा जिल्हा ही मागे नाही.घटना घडल्या की,पोलीस दप्तरी नोंद होते.परंतु पुढील तपास सुरूच असतो. येथील कारागृहाच्या पाठीमागे शेती शाळेजवळच्या शिवारात एका पुरुष जातीचे मृत अर्भक बेवारस स्थितीत आढळले. अज्ञात निर्दयी मातेने हे नवजात अर्भक फेकून दिले असावे.सदर घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.अज्ञात इसमाने नवजात अर्भक फेकून दिल्याने त्याच्या विरुद्ध कलम 94 बी एन एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शशिकांत धारकरी करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!