बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शासकीय रुग्णालयात असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक यांचे नातेवाईक असलेले डॉ. शेवाळे सरकारी रुग्णालयातील रुग्ण आपल्या व्यसनमुक्ती केंद्रात हलवतात.मनमर्जी पैसे उकडतात, असा आरोप त्यांच्यावर अनेकदा झाला. आज या आरोपावर शिक्कामोर्तब झालं असून एका शिक्षकाने व्यसनमुक्ती केंद्रात आत्महत्या केल्याची घटना घडल्याने यंत्रणा हादरली आहे.
चिखली रोड वरील रिलीफ व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेले एका 47 वर्षीय शिक्षकांनी फाशी लावून आत्महत्या केली आहे.या शिक्षकाचे वय 47 वर्षे होते.सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सुनील काशिनाथ पाटील यांनी आपल्या खोलीत फाशी घेतली तरी ही बाब सायंकाळी समोर आली.म्हणजे शासकीय जिल्हा रुग्णालयाची ही ताकद म्हणावी लागेल आणि यंत्रणेला दोष द्यावा लागेल! जिल्हा शल्यचिकित्सक भागवत भुसारी यांचे डॉ. शेवाळे नातेवाईक असून खामगावचे तहसीलदार विजय पाटील यांचे बंधू मृतक सुनील पाटील आहेत. व्यसनामुळे त्रस्त झाल्याने काही दिवसापूर्वी डॉ कुणाल शेवाळे यांच्या चिखली रोड स्थित असलेले रिलीफ व्यसनमुक्ती केंद्रात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु त्यांनी आत्महत्या केल्याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.विशेष म्हणजे सरकारी दवाखान्यात शेवाळे कार्यरत आहेत.(वार्ड क्रमांक 12 नंबर मध्ये ओपीडी ) मानसिक रोग तज्ञ म्हणून रुग्णांना आपल्या व्यसनमुक्ती केंद्रात हलवीत असतात परंतु ते कागदोपत्री! कंप्लेंट अशी पण आहे की शेतकरी आत्महत्या संदर्भात त्यांचे कर्तव्य असले तरी शेतकरी आत्महत्या साठी त्यांचे काहीच योगदान नाही.आले तर आले असा त्यांचा कारभार असून आत्महत्या संदर्भात ते ओपीडीमध्ये व्हिजिट देत नाहीत त्यामुळे या विभागाचे कर्मचारी करतात तरी काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.










