बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यांमध्ये पेपर फुटीमुळे लाखो बरोजगार तरुणांचे भविष्य पणाला लागले आहे. अनेक सरकारी पदांच्या भरतीमध्ये पेपर फुटीने परीक्षा रद्द झाल्यात. आज बुलढाण्यात नर्सिंग पेपर लीक झाला त्यामुळे मुलांनी वर्षभरात केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. पेपर फुटी का रोखता येत नाही ? कायदा अपुरा की सरकारच गंभीर नाही ? आता या नर्सिंग पेपर फुटी चे कनेक्शन कुठपर्यंत आहे ? असा प्रश्न उपस्थित झालाय.
बुलढाण्यात नर्सिंगचे प्रशिक्षण
घेत असलेल्या 16 विद्यार्थ्यांनी पेपर फोडल्याचे चव्हाट्यावर आले आहे. या प्रकरणात 4 भावी
अधिपरिचारक आणि एक अधिपरिचारिका यांच्याविरोधात पोलिस तक्रार होणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक भागवत भुसारी यांनी ‘हॅलो बुलढाणा’ला दिली आहे. आज राज्यभरात
जीएनएमच्या अर्थात जनरल नर्सिंग ॲण्ड मिडवायफरीच्या द्वितीय वर्षाची म्हणजे फायनल परीक्षा होती. बुलढाण्यात दोन
ठिकाणी परीक्षा केंद्रे देण्यात आलेली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील
नर्सिंग सेंटरवर 105 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. आज मेंटल हेल्थ नर्सिंग 75 मार्कांचा पेपर होता. दरम्यान पेपर सोडविणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या शर्टाच्या बाहीवर उत्तर लिहीलेले आढळले.
या कॉपीबहाद्दराला जेव्हा रूममधील
पर्यवेक्षकांनी उभे केले आणि
कॉपी चेक केली तेव्हा परीक्षेमधील प्रश्न आणि
त्याची कॉपी सेम आढळून आली आहे.दरम्यान इतरांची चौकशी केली असता 16 विद्यार्थ्यांकडे केवळ प्रश्न उत्तरे होती तर 5 जणांकडे अख्खा पेपर मिळून आला आहे. दरम्यान सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा थांबविण्यात आली.कॉपी बहादूरांचे पंधरा ते सोळा मोबाईल व पेपर जप्त करण्यात आले. दरम्यान बोर्ड पुढील कारवाई करणार आहे.परंतु पेपर फुटीही ज्वलंत समस्या बनत चालली असून तरुणांचे भविष्य अंधारात सापडत आहे. तरुण सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेची तयारी करतात परंतु पेपर लीक झाल्याने त्यांचे भविष्य टांगणीला लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारी नोकर भरती, सरळ सेवा भरतीच्या परीक्षा कंत्राटदार खाजगी कंपन्याकडून घेतल्याचा जबर फटका बसत असून पेपर फुटीचे पेव वाढत आहे.











