बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज सकाळी पहाटे 4 वाजताच्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील डिझेल चोराची बातमी सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ ने सकाळी प्रकाशित केली होती.तीन चोरटे पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाल्याचे वृत्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनावर घेतले.दरम्यान तपास चक्र फिरवून पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली तर 705500 रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलाय.
आज भल्या पहाटे उभ्या ट्रक मधील डिझेलच्या टाक्या चोरून इर्टिगा गाडीमध्ये भरणाऱ्या 3 ते 4 गुन्हेगारांचा पोलिसांनी पाठलाग केला असता, इंर्टीगा गाडी गेटवर धडकल्याने अपघात झाला आणि चालक पोलिसांच्या हाती लागला. मात्र 2 ते 3 जणांनी यावेळी पोलिसांना गुंगारा देत पळ काढला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 10 डिझेलच्या टाक्या जप्त केल्या होत्या.ही घटना महामार्ग पोलीस उपकेंद्र दुसरबीड सिंदखेड राजा येथील समृद्धी महामार्गावर घडली. दरम्यान फरार झालेल्या आरोपींचा शोध बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे.पोलिसांच्या हाती लागलेला जखमी चालक ज्ञानेश्वर फकिरवा सोसरे यास मुलीशी खात्या दाखविला असता त्याने साथीदारांबाबत माहीती दिली.
फरार आरोपीचा शोध घेत असतांना शुभम दिपक उबरहंडे वय 25 वर्ष रा चिखली हा मलकापुर पांग्रा येथे पळुन जाण्याच्या
बेतात असतांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व इतर साथीदारां बाबात विचारपुस केली असता त्याने सांगीतले की मी
भैय्या नावाचे इसमासोबत आलो होतो. त्यानेच आम्हाला सर्व साहीत्य व चोरी करण्यासाठी गाडी पाठविली होती. शुभम उबरहंडे याचे
कडुन भैय्याचा मो. नं. घेवुन त्याची तांत्रीक माहीती घेवुन शोध घेतला असता तो भिमराव दगडु इंगळे रा मांडवा यांचे कपाशीचे शेतात तुरीच्या पाटयामध्ये लपलेला मिळुन आला. त्याला विजय सुदाम साळवे यांचे समक्ष ताब्यात घेतले असता त्याला भुवईला व
कपाळाला अपघातामध्ये मार लागून रक्त निघत होते. त्याला नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव हर्षद ऊर्फ भैय्या पांडुरंग साबळे
वय 23 वर्ष रा डौलखेड ता जाफ्राबाद जि जालना असे सांगितले. त्यानंतर त्याच्या इतर साथीदारांच्या वर्णनावरून पोलीस पथकाने शोध घेतला असता आरोपी संकेत सुनिल बोर्डे रा. आटोळ हा मिळुन आल्याने त्यास मलकापुर पांग्रा येथून ताब्यात घेण्यात आले.
गुन्हयात आरोपीतांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलेले दोन कॅन मध्ये असलेले 50 लिटर डिझेल किंमती 4800 रु तसेच एक इर्टीगा वाहन क्रमांक एम एच 28 व्हि 9310 किंमती 7 लाख रुपये तसेच दोन प्लॉस्टीक नळया किंमती 100/रुपये 6 रिकाम्या प्लॉस्टीक कॅन किंमत 600 रुपये असा एकुण 705500 रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. सदर कार्यवाही बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक श्री विश्व पानसरे , अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा बि.बि. महामुनी सा.अपर पोलीस अधिक्षक खामगाव अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर प्रदिप पाटील, पोनि स्वागुशा अशोक लांडे यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे बिबी चे ठाणेदार सपोनि संदिप पाटील, सफी परमेश्वर शिंदे व ,
चापाहेको अशोक अंभोरे , नापोकों नितीन मापारी व , नापोकों अरुण सानप, पोकों यशवंत जैवळ बन पोकों रविंद्र बोरे, पोकों भारत ढाकणे यांनी केली आहे.










