spot_img
spot_img

एसपी साहेब.. मूलाचा खूनी योगेश सौभागेला अटक करा हो! -मृतक मुलाच्या आईचा टाहो! -वडिलांनी दिले एसपी विश्व पानसरे यांना निवेदन!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘माझ्या मुलाचा मारेकरी मोकाट असून, हत्यारा व अवैध सावकार योगेश भीकाज सौभागे याला तत्काळ

अटक करा,असा टाहो मृतक मुलाच्या आईने फोडला.मृतक मुलाच्या वडिलांनी या संदर्भातील मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांना मेहकर येथील शांतता समिती बैठकी दरम्यान दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मेहकर येथील अवैध सावकार योगेश भीकाजी सौभागे याने दिनांक २७/०५/२०२४ रोजी रात्री १० ते
१०:३० दरम्यान मेहकर येथील जानेफळ रोडवरील स्मशान भुमीच्या मागे दगड़ाने व लाठ्या काठ्याने आकाश राजू ननवरे यास व्याजाच्या पैश्यासाठी जीवाने मारण्याच्या उद्देश्याने मारहाण केली त्या मारहाणीत मुलाचा मृत्यु झाला. मृत्यु झाल्यानंतर मेहकर पोलिस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेलो असता प्रथम मेहकर पोलिसांनी अवैध सावकार योगेश सौभागे याच्या विरोधात तक्रार घेण्यास
टाळाटाळ केली त्यानंतर आम्ही उपविभागीय पोलिस अधिकारी मेहकर यांच्या कड़े तक्रार केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मेहकर पोलिस स्टेशनला दिले परंतु तरीही मेहकर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी एफ आय आर मधून योगेश
भीकाजी सौभागे याच नाव वगळून इतर आरोपी वर गुन्हा दाखल करून उलट आम्हाला दमदाटी करत तेथून हकलून लावले. त्यानंतर न्याय मिळण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक
यांच्या बुलढाणा येथील कार्यालया समोर १५/०६/२०२४ पासून आमरण उपोषण आंदोलन केले.कुटुंबासह मुख्य आरोपी अवैध सावकार योगेश भीकाजी सौभागे याला अटक करण्याची मागणीसाठी २८/०६/२०२४ पर्यंत उपोषण केले. त्यादिवशी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या आश्वासना नंतर उपोषण मागे घेतले. त्यानंतर अवैध सावकार
योगेश सौभागे यांच्या अटकेसाठी वांरवार मेहकर पोलिस स्टेशनकडे पाठपुरवठा केला परंतु अद्यापही मुख्य आरोपी योगेश सौभागे याला अजूनही अटक केली नसून तो मोकाट फिरत आहे.आरोपी माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देत असून “माझ कुणीही काही वाकड करू शकत नाही माझ्या कड़े खुप
पैसा आहे सर्व पोलिस प्रशासन व वकील पैसे देऊन खरेदी केले आहेत हे प्रकरण संपल्यावर मी तुम्हाला बघून घेईन” अश्या सर्रास धमक्या देत आहे. त्यामुळे
या प्रकरणी लक्ष घालून मुख्य आरोपीला तत्काळ अटक करावी, शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!