बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेळी असो की गुरे ढोरे या पाळीव प्राण्यांचा पशुपालकांना मोठा आधार असतो.पशुपालक पाळलेल्या प्राण्यांवर मोठा जीव लावत असतात.परंतु दोन दिवसातील अतिवृष्टीने २ तालुक्यातील लहान १३७ व एक मोठया असे १३८ पाळीव जनावरांचा जीवच घेतलाय.त्यामुळे पशुपालक हवालदील झालेत.
बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे १४५ गावांतील ११ हजार ६०९ हेक्टरवरील पिकांचेनुकसान झाले.बुलढाणा,शेगाव आणि मोताळा तालुक्यातील १३ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १४ टक्के पाऊस अधिक झाला आहे. ३ तालुक्यां मधील १३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. परिणामस्वरूप बुलढाणा,मोताळा,संग्रामपूर
आणि खामगाव तालुक्यातील ७ गावांमध्ये २६ घरांचे अंशतः नुकसान झाले. १ ते ३ सप्टेंबर दरम्यान खामगाव व मोताळा तालुक्यातील छोटी १३७ व मोठे एक असे एकुण १३८ गुरे दगावली आहेत.












