spot_img
spot_img

रुग्णसेवेच्या नावावर खाल्ला पोट फुटे पर्यंत मेवा! -भ्रष्टाचाऱ्यांच्या अनैतिक संपत्ती जप्तीची कारवाई केव्हा?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार जिल्हा सामान्य रुग्णालयात चव्हाट्यावर आल्यानंतरही ब्लड बँक मध्ये सुद्धा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले.भंडारपाल प्रकाश नामदेव बोथे निलंबित झाला तर इतर सहकाऱ्यांनी पद्धतशीरपणे आपली चमडी वाचवून ठेवली आहे.वेगवेगळ्या समित्यांची व एसीबी कडून कासव गतीने चौकशी सुरू असली तरी,या भ्रष्टाचार प्रकरणातील दोषींची उच्चस्तरीय चौकशी होऊन आणि त्यांनी भ्रष्टाचारातून कमावलेली अफाट अनैतिक संपत्ती व यातून घरच्या व दारच्या नावावर खरेदी केलेले बंगले, शेती, प्लॉट,गाड्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याची मागणी केली जात आहे.

बुलढाणा जिल्हा रुग्णालयात भ्रष्टाचाराने कळस गाठला. आमदार संजय गायकवाड यांनी या भ्रष्टाचार प्रकरणी लक्षविधी लावली होती.त्यानंतर अनेक समित्या गठीत करून चौकशी करण्यात आली.चौकशी दरम्यान भंडारपाल बोथे याला निलंबित करण्यात आले.परंतु इतर तत्कालीन तत्कालीन डॉ. प्रेमचंद पंडीत,डॉ.नितीन तडस,प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक व इतर विभागातील अधिकारी,कंत्राटदार यांच्याविरुद्ध शेकडो तक्रारी झाल्या तरी कारवाई शून्यवत आहे.चौकशीचा ससेमिरा नाटकी ठरून समितीनेही पार्सल घेतल्याचा असल्याचा आरोप होतोय.रुग्णालयीन साहित्य खरेदी करून खोटे बिल कागदोपत्री सादर करून कोट्यावधींचा भ्रष्टाचार करण्यात आला.या प्रकरणातील संबंधित अधिकारी व ब्लॅक लिस्टमध्ये असलेले आजही कार्यरत असलेल्या कंत्राटदारांची उजळ माथ्याने वाटचाल सुरू आहे.शिवाय कोरोना काळात ब्लड बँक मध्येही लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण आता चव्हाट्यावर आले आहे. या भ्रष्टाचार प्रकरणातील दोषींची उच्चस्तरीय चौकशी होऊन आणि त्यांनी भ्रष्टाचारातून कमावलेली अफाट अनैतिक संपत्ती व यातून घरच्या व दारच्या नावावर खरेदी केलेले बंगले, शेती, प्लॉट,गाड्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!