spot_img
spot_img

‘बाप्पा माझा किती गोड दिसतो..’ -चिमुकल्यांनी साकारल्या बाप्पांच्या शाडूच्या मूर्ती!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बाप्पांच्या आगमनाची चिमुकले वाट पाहत असून शाडूच्या मातीला आकार देत चिमुकल्यांनी पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती बनविण्याचा संदेश अधोरेखित केला आहे.

मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाडूच्या माती पासून गणेश मूर्ती साकारण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यात आर्टिस्ट श्रीहरी ठोसर यांनी बालकांना व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांना शाडूच्या माती पासून पर्यावरण पूरक सुंदर मूर्ती कशी साकारयाची याचे मार्गदर्शन केले. मयूरकुंज या ठिकाणी आयोजित कार्यशाळेत 70 पेक्षा जास्त बालकांनी सहभाग घेतला.या संदर्भातील
छायाचित्र रविकिरण टाकळकर यांनी टिपले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!